सावली फाउंडेशन
सावली फाउंडेशन विषयी :
संस्थेचा पूर्व इतिहास
२६ नोव्हेंबर २००९ रोजी एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सावली प्रकाशन संस्था नावाने तात्पुरत्या स्वरूपात एक संस्था सुरू करण्यात आली. परंतु विविध प्रशासकीय कागदपत्र व नियमावली यांना बांधील राहून प्रस्ताव सहाय्यक धर्मादाय आयुक्त नाशिक यांच्याकडे सादर करू न शकल्यामुळे २०१६ पर्यंत सदर प्रकाशन संस्थेस राज्य सरकारच्या धर्मदाय न्यासाची मान्यता भेटू शकली नाही. Learn More
संस्था नोंदणी
सदर संस्थेस, संस्था नोंदणी अधिनियम १८६० च्या अधिनियम २१ अन्वये ७ एप्रिल २०१६ रोजी "सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा ता. येवला जि. नाशिक" या नावाने तात्पुरती मान्यता सहाय्यक संस्था निबंधक नाशिक विभाग, नाशिक यांचेकडून देण्यात आली होती. तर मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या अधिनियम क्रमांक २९ अन्वये नाशिक येथील सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालयाकडून "सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्था पाटोदा, ता. येवला जि. नाशिक" नावे नोंदणी पुस्तकातील क्रमांक 'र. जी : एफ १६६९२ नाशिक' नावे २२ ऑगस्ट २०१६ रोजी धर्मदाय उप आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांचेकडून मान्यता देण्यात आली.
संस्थेचा हेतू
सदर संस्था शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक, क्रीडा व वैद्यकीय, क्षेत्रात विविध प्रकारचे प्रबोधन, मानवविकास, उभारणी व अंमलबजावणी सारखे समाजोपयोगी कार्य करेल.
जनजागृतीपर कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम
धर्मादाय उपायुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे संस्थेची यशस्वी नोंदणी झाल्यानंतर संस्थेने २००९ पासून २०१३ पर्यंत व २०१३ पासून २०१६ पर्यंत या दोन टप्प्यात केलेल्या विविध सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अनुभवांच्या आधारे संस्थेने २०१६ ते २०१९ या वर्षांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रिडाविषयक उपक्रम राबवून उद्देश व त्यातील हेतू साध्य करण्यात यशस्वी प्रयत्न केला आहे तसा अहवाल व लेखा परीक्षण अहवाल धर्मादाय उपायुक्त नाशिक विभाग, नाशिक यांना १६ ऑक्टोबर २९१८ रोजी सादर करण्यात आला आहे.