शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

रक्तदान शिबिर व वार्षिक सर्वसाधारण सभेची मीटिंग.

 अत्यंत महत्वाची सूचना 

 

भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होत असले निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना म्हणून आपल्या सावली समाजसेवी संस्था व नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा नेऊरगाव येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी आपल्या सावली समाजसेवी


बहुद्देशीय संस्था पाटोदा ची वार्षिक सर्वसाधारण मीटिंग, अध्यक्ष निवड व इतर कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी 15 ऑगस्ट रोजी ठीक 8 वाजता नेऊरगाव येथे उपस्थित रहावे या विनंती सह. नवीन सभासद करावयाचे असल्यास त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स, फोटो व स्वतः नवीन होऊ पाहणारे सभासद उपस्थित राहणे अपेक्षित.

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

अंकाई येथील वृक्ष लागवडीची दखल.

स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार व सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने अंकाई-टंकाई किल्ल्यावरती मैत्री दिवशी करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची एबीपी माझा चे संतोष बटाव, दैनिक गावकरी चे विलास पगारे सर व ओएस न्यूज चे दीपक उगले सर यांनी दखल घेत आपापल्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी दिल्याबद्दल दोघांचेह मनस्वी आभार!!!

दैनिक गावकरी मधील वृत्त.


ओ.एस न्यूज या डिजिटल चैनल वरील वृत्त.
https://youtu.be/lHca5AWMINY
    *🎥OS NEWS🎥*
 *🌐स्पेशल रिपोर्ट🌐* 
 _*🛑येवला:-अंकाई-टंकाई किल्ल्यावर मैञी दिनानिमित्त वृक्षारोपण , माकडांच्या अन्नपाण्यासाठीही नियोजित उपक्रम राबवणार.*_

दीपक उगले सरांचे मनःपूर्वक धन्यवाद

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

गावकरी वृत्त

आपल्या सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्थेच्या वृक्षलागवडीची दैनिक गावकरी चे विलास पगारे यांनी घेतलेली दखल. धन्यवाद सरजी

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

दैनिक देशदूत मध्ये सावलीची बातमी.

आपल्या सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्थेने नेहरू युवा केंद्र नाशिकच्या समन्वयाने देवदरी येथे केलेल्या वृक्षरोपणाची दखल दैनिक देशदूत वार्ताहर सिताराम बैरागी यांनी घेतली. त्याबद्दल चे वृत्त दैनिक देशदूत मध्ये. सरांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!
मध्ये आज प्रसिद्ध झाले आहे.

मंगळवार, २८ जुलै, २०२०

सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची वृत्तपत्रांनी घेतली दखल

सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्थेने दिनांक 27 जुलै रविवार रोजी येवला तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या देवदरी येथे केलेल्या वृक्षारोपणाची दैनिक नवभारत चे वार्ताहर विलास कांबळे व दैनिक आपलं महानगर चे वार्ताहर दीपक उगले यांनी दखल घेऊन त्यांच्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी दिली. दोघांचे मनस्वी आभार सोबत वृत्तपत्रांची कात्रणे.

दैनिक नवभारत मध्ये आलेली न्यूज. दैनिक नवभारतचे विलास कांबळे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक धन्यवाद.
दैनिक आपलं महानगर मध्ये आलेली न्यूज. दैनिक आपलं महानगर चे दीपक उगले व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक धन्यवाद.

सोमवार, २७ जुलै, २०२०

येवला तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या देवदरी या पर्यटनासह धार्मिक स्थळी 150 वृक्षरोपांची लागवड

"सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा" च्या वतीने "युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार" द्वारा "नेहरू युवा केंद्र नाशिक" यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 26 जुलै 2020 रोजी येवला तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या देवदरी या पर्यटनासह धार्मिक स्थळी 150 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. सदर वृक्ष रोपांची लागवड बंदिस्त तार कंपाउंडमध्ये करण्यात आली असल्यामुळे या पैकी किमान 90 टक्के झाडे जगतील असे मत सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष परसराम शेटे यांनी व्यक्त केले.







प्रसंगी उपाध्यक्ष मच्छिंद्र काळे, सहसचिव अनिल निकम, खजिनदार पंकज मढवई, बनकर पाटील पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल पंकज निकम, व्हॉइस प्रिन्सिपल दीपक देशमुख, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, चांदवड कनिष्ठ न्यायालयाचे लिपिक अनंत लभडे, कदम पाटील इंग्लिश मीडियम स्कूल चे व्हाईस प्रिन्सिपल संतोष खकाळे, सामाजिक कार्यकर्ते निंबाजी फरताळे, स्टडी सर्कल चे संचालक सचिन अहिरे, सावली चे सचिव तथा नेहरू युवा केंद्र येवला तालुका युवा राष्ट्रीय स्वयंसेवक महेश शेटे, मुकुंद अहिरे आदी उपस्थित होते. प्रसंगी वृक्षारोपणासाठी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना साठी पाणी बॉटल व अल्पोपहाराची व्यवस्था भारम येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल व्यवहारे यांनी केली होती.