"सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा" च्या वतीने "युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार" द्वारा "नेहरू युवा केंद्र नाशिक" यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 26 जुलै 2020 रोजी येवला तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या देवदरी या पर्यटनासह धार्मिक स्थळी 150 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. सदर वृक्ष रोपांची लागवड बंदिस्त तार कंपाउंडमध्ये करण्यात आली असल्यामुळे या पैकी किमान 90 टक्के झाडे जगतील असे मत सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष परसराम शेटे यांनी व्यक्त केले.
प्रसंगी उपाध्यक्ष मच्छिंद्र काळे, सहसचिव अनिल निकम, खजिनदार पंकज मढवई, बनकर पाटील पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल पंकज निकम, व्हॉइस प्रिन्सिपल दीपक देशमुख, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, चांदवड कनिष्ठ न्यायालयाचे लिपिक अनंत लभडे, कदम पाटील इंग्लिश मीडियम स्कूल चे व्हाईस प्रिन्सिपल संतोष खकाळे, सामाजिक कार्यकर्ते निंबाजी फरताळे, स्टडी सर्कल चे संचालक सचिन अहिरे, सावली चे सचिव तथा नेहरू युवा केंद्र येवला तालुका युवा राष्ट्रीय स्वयंसेवक महेश शेटे, मुकुंद अहिरे आदी उपस्थित होते. प्रसंगी वृक्षारोपणासाठी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना साठी पाणी बॉटल व अल्पोपहाराची व्यवस्था भारम येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल व्यवहारे यांनी केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा